प्रतिनिधी :- दौंड
सैनिक आपल्या दारी अभियानात अंतर्गत त्रिदल सैनिक सेवा संघाचे माध्यमातून सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील मा.पालकमंत्री,मा.जिल्हाधिकारी,मा.पोलिस अधिक्षक,त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यातील मा.आमदार,मा.उपविभागीय अधिकारी,मा.उपविभागीय पोलिस अधिकारी,मा.तहसिलदार,मा.पोलिस निरीक्षक,गटविकास अधिकारी व ज्या शासकीय विभागामध्ये सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी त्या विभागामध्ये जावून सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी रात्रीचे दिवस करून सैनिक आपल्या दारी अभियानात अंतर्गत त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून अडीअडचणी सोडविण्याचे काम चालु आहे.तरी महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी असल्यास त्रिदल सैनिक सेवा संघाच्या वतीने जाहिर आव्हान करण्यात आले आहे की,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ)लगड यांच्याशी संपर्क करावा संपर्क ८९८१७७७१७१/९४०३१७७७११/६३९११७७१७१/६३८९१७७१७१ या नंबरवर संपर्क केल्यास या मॅसेज पाठविल्यास आपली अडचन त्वरीत दूर केली जाईल.हे अभियान त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप(भाऊ)लगड,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोरकमिटीचे अध्यक्ष मा.जे.के.कटके,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष मा.अकुंशजी खोटे,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ता मा.विक्रम जगताप,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस मा.काशिनाथ पंडीत,त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे जनसंपर्क अधिकारी मा.राजेंद्र कापरे,त्रिदल सैनिक सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा.आबासाहेब गरूड,त्रिदल सैनिक सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे.
या अभियानामध्ये महाराष्ट्र राज्यातील लाखो सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी दूर केल्या जातील असे मत पत्रकारांशी बोलताना त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कोरकमिटीचे अध्यक्ष मा.जे.के.कटके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.या अभियानामध्ये प्रत्येक गावातील ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आजी-माजी सैनिकांचा बोर्ड लावण्यात येणार आहे.प्रत्येक गावात त्रिदल सैनिक सेवा संघाची शाखा काढण्यात येणार आहे.या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडून महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराला एकत्र करण्याचे काम चालु आहे.येत्या सहा महिन्यात महाराष्ट्रात राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी दूर होतील या अभियानामध्ये महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र राज्यातील ताालुकाध्यक्ष भाग घेणार आहेत.
0 टिप्पण्या