फलटणमध्ये MRP चे उल्लंघन करणाऱ्या देशी दारू परवाना धारकांवरती कारवाई ; जनतेकडून कारवाईचे समर्थन...!

शासनाकडून कडक नियमावली असतानाही फलटण येथे एम.आर.पी. पेक्षा जास्त दराने देशी दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर एक्साईज विभागाने कार्यवाही केली आहे. आज दिनांक -13-2-2023 रोजी सकाळी 11 वाजता फलटण येथे धडाडीचे समाजसेवक सागर सोनावले(मेजर) यांच्या नेतृत्वात मोती चौकातील देशी दारू दुकान परवाना क्र. 74 येथे तोतया ग्राहक पाठवण्यात आला. सदर ग्राहकास 35 रुपयाची देशी दारूची बाटली, 40 रुपयांना विकण्यात आली. सबळ पुरावे हाती आल्या नंतर सागर सोनवणे यांनी एक्साईज विभागाचे फलटण येथील अधिकारी. श्री शिवाजी काळे यांना बोलावून कार्यवाही करण्यास व गुन्हा नोंदवून घेण्यास भाग पाडले. सबळ पुराव्यांच्या आधारे श्री शिवाजी काळे यांनी धडक कार्यवाही करत सदर देशी दारू विक्रेत्यावर 50 हजारांचा दंड ठोठावला.  
          या बाबत तळीरामांना समजताच, त्याच दुकानात एम.आर.पी. ने दारू विकत घेऊन झालेल्या कारवाई बाबत आनंद व्यक्त केला.   
         या प्रकरणी राजेश राऊत, श्रियश बामणे व सत्यजित कदम यांचे सहकार्य लाभले. तसेच फलटण मध्ये कुठेही एम.आर.पी. पेक्षा जास्त दराने दारू विक्री करणाऱ्या विक्रेतांबाबत तक्रार करण्यास पुढे यावे असे आवाहन श्री. शिवाजी काळे त्यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या