चाकोरे गावात महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन

चाकोरे गावात महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन


 जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा चाकोरे, प्रताप नगर, जावळे वस्ती, खरात वस्ती व विठोबा पाटीलवस्ती या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत मा.जि.प.सदस्या सौ. मंगलताई वाघमोडे यांच्या संकल्पनेतून उत्कृष्ट महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यासाठी प्रमुख व्याख्यात्य् म्हणून डॉ.सौ. तृप्ती सिद मॅडम, डाॅ. सौ. जोत्स्ना गायकवाड मॅडम, तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या (अमेरिकास्थित) सौ.राधिका मलगुंडे मॅडम लाभल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.मंगलताई वाघमोडे या होत्या तर कार्यक्रमाला गावच्या सरपंच सौ.दिपालीताई जाधव, मा.सरपंच सौ. अर्चनाताई शिंदे ग्रामपंचायत सदस्या सौ. शितलताई वाघमोडे सौ. शोभाताई वाघमोडे माळीनगर बीटच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ. कुलकर्णी मॅडम चाकोरे व चाकोरे परिसरातील सर्व शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व महिला सदस्या पीएचसी माळीनगर आरोग्य केंद्रातील कर्मचारी सर्व अशा सेविका,सर्व शिक्षिका, माळीनगर बीट मधील सर्व अंगणवाड्यांच्या अंगणवाडी सेविका गावातील सर्व प्रतिष्ठित पदाधिकारी व ग्रामपंचायतचे कर्मचारी सर्व शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
 कार्यक्रमाची सुरुवात स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाबाई आहेत, राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली.
 व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या सत्कार नंतर कर्तुत्ववान महिलांचा यथोचित सन्मान सौ. मंगलताई वाघमोडे यांच्या तर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये किडनीदान केलेल्या अंगणवाडी सेविका श्रीम. संगीताताई कोळेकर सर्व शिक्षिका आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका आशा सेविका व उपस्थित सर्व महिला यांचा समावेश होता.शाळेतील विद्यार्थिनींनी कर्तुत्ववान महिलांच्या जीवनावर आधारित भाषणे केली डॉ.तॄप्ती सिद मॅडम व डॉ.जोत्स्ना गायकवाड मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनाने सर्व महिलांना उदबोधित केलं. तसेच सौ.अरुंधती हजारे यांनी बेटी बचाव या उपक्रमांतर्गत प्रभावशाली नाट्यछटा सादर केली. या मेळाव्यामध्येच उपस्थित सर्वच महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच महिलांसाठी काही मनोरंजनाचे खेळही घेण्यात आले त्यामध्ये तीन क्रमांक काढण्यात आले. क्रमांक मिळालेल्या महिलांना सौ.मंगलताई वाघमोडे यांच्या वतीने संसार उपयोगी वस्तू बक्षीस म्हणून दिल्या.श्री.मारूती जाधवसर यांनी आपल्या विनोदी शैलीने सर्वांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब शिंदे यांनी केले. कार्यक्रमासाठी मनमोहक अशी रांगोळी श्रीम. सपकाळ मॅडम श्रीम. सूर्यवंशी मॅडम श्रीम. शेळके मॅडम व श्रीम. कुंभार मॅडम यांनी काढली शाळेच्या वतीने उपस्थित सर्वांनाच अल्पोपाआहाराचे आयोजन करण्यात आले आले होते. अल्पोपाहार वाटपाचे नियोजन श्री. अशोक राजगुरू सर श्री. जगदीश जाधव सर यांनी केले तर महिला दिनानिमित्त उत्कृष्ट फलक लेखन श्री. निसर पठाण सर व श्री. एकनाथ कदम सर यांनी केले. सत्कार समारंभाचे नियोजन श्री.जयंत पाटोळे सर व श्री टकले सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रदीप राजगुरू सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थिनी कु.अक्षरा जंगम व कु.सृष्टी वरकड या विद्यार्थिनींनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या