जन आधार मागासवर्गीय संस्थेच्या वतीने महिलांचा सन्मान

जन आधार मागासवर्गीय संस्थेच्या वतीने महिलांचा सन्मान

जनआधार मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त माळशिरस तालुक्यातील शंकर नगर व पुरंदावडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टर आरोग्य सेविका व आशा सेवक यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला जन आधार मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात जनआधार संस्था ही नेहमीच एक वेगळा उपक्रम राबवत असते कोरोना काळात प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टर आरोग्य सेविका आशा सेवक यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला व त्यांचे आभार मानण्यात आले हा कार्यक्रम जनआधार मागासवर्गीय संस्थेचे अध्यक्ष रोहिदास साठे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला होता या कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहिते साहेब डॉ. परतवार मॅडम डॉ. बोबडे मॅडम कदम मॅडम,उंडे मॅडम,ओव्हाळ मॅडम संस्थेच्या सदस्या जयश्री देवकूळे, पल्लवी लोखंडे.डॉ.वाघमोडे.संस्थेचे अध्यक्ष रोहिदास साठे उपाध्यक्ष राहुल साठे सहसचिव लखन साठे तसेच जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष संतोष खंडागळे पत्रकार सोमनाथ खंडागळे लाला निकम विजय लोखंडे हनुमंत जमादार उपस्थित होते यावेळीसंस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या