मैत्री प्रतिष्ठान माळशिरस तालुका महिला अध्यक्षपदी पूजा मकवाने तर माळशिरस तालुका संघटक पदी अंजली कश्यप यांची निवड...

मैत्री प्रतिष्ठान माळशिरस तालुका महिला अध्यक्षपदी पूजा मकवाने तर माळशिरस तालुका संघटक पदी अंजली कश्यप यांची निवड...

मैत्री प्रतिष्ठान माळशिरस तालुका महिला पद निवडी जाहीर करण्यात आल्या.मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष नीता सुळे व तालुकाध्यक्ष संजय वाघमोडे यांच्या नेतृत्वा मध्ये "माळशिरस तालुका महिला अध्यक्ष पदी पूजा मकवाने तर माळशिरस तालुका महिला संघटक पदी अंजली कश्यप यांची निवड करण्यात आली".मैत्री प्रतिष्ठान एक सामाजिक संघटना आहे व त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही समाजापर्यंत समाज हिताची कामे पोहचवू व महिला संघटन वाढवू असे पूजा मकवाने व अंजली कशब यांनी आपलं मत व्यक्त केले.यावेळी मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष नीताताई सुळे, तालुका अध्यक्ष संजय वाघमोडे,तालुका उपाध्यक्ष शंकर मस्के,तालुका कार्याध्यक्ष श्रीकांत धनवडे, तसेच एडवोकेट जाधव साहेब,एडवोकेट मंडले साहेब व आमचे सहकारी भिंगारदेवे साहेब आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या