सैनिक कल्याण संघ ही रजिस्टर झालेली संस्था आहे आणी या संस्थेमध्ये सभासद माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, आजी सैनिक परिवारातील आई,वडील,मुले तसेच आजी सैनिकाची पत्नी तसेच अर्धसैनिक बलातील सेवानिवृत्त सैनिक सभासद होऊ शकतात अशी माहिती कोअर कमिटी अध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी दिली.
संघटनेचा मुख्य उद्देश आत्मनिर्भर सैनिक करणे हा असेल. तसेच सैनिकांना सेवानिवृत्त झाल्यावर व्यवसायाकडे आकर्षित करून पाठबळ आणी मार्गदर्शन करणे राहिल. सैनिक आणी सैनिक परिवाराच्या जिल्हा सैनिक कल्याण बोर्डातून लाभ असणाऱ्या योजनांची माहिती पोहचवने हे काम ही संघटना करणार आहे.
सैनिक कल्याण संघटनेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य असेल, सध्या या संघटनेचे 6 बचत गट कार्यरतअसून या माध्यमातून जवळपास 150 सैनिक परिवार यातजोडले गेले आहेत असे संघटनेचे अध्यक्ष प्रशांत शेंडकर साहेब यांनी सांगितले.
भविष्यात अजून बचत गट काढण्यात येतील असे ही सांगण्यात आले. संघटनेचे प्रवक्ता विक्रम जगताप यांनी अधिक माहिती देताना संघटना सैनिकांना आत्मनिर्भर करण्यावर आपले लक्ष केंद्रित करणार आहे असे सांगितले. संघटना फक्त कागदोपत्री नसणार आहे संघटनेचे सर्व ऑडिट आणी इतर कायदेशीर बाबींची पूर्तता आणी आर्थिक व्यवहार चोख ठेवले जातील असे मत संघटनेचे सचिव सुनील लोखंडे आणी कोषाध्यक्ष विजय गोलांडे यांनी व्यक्त केले.
तसेच तक्रार निवारण कमिटी चे अध्यक्ष सतीश गायकवाड आणी उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे यांनी तक्रार निवारण कमिटीचा कार्यभार हाथी घेतला आणी आपल्या स्तरावर सैनिक परिवाराच्या अडचणी सोडवण्याचा मानस व्यक्त केला.
0 टिप्पण्या