Baramati Bus stand : दादांनी पुढच्या तीस वर्षांचा विचार केला,काम युद्ध पातळीवर,दस-यापर्यंत बारामतीचे नवीन बसस्थानक पूर्णत्वास जाणार....!

Baramati Bus stand : दादांनी पुढच्या तीस वर्षांचा विचार केला,काम युद्ध पातळीवर,दस-यापर्यंत बारामतीचे नवीन बसस्थानक पूर्णत्वास जाणार....!


बारामती - येथे साकारत असलेले राज्य परिवहन महामंडळाचे अत्याधुनिक बसस्थानक येत्या दस-यापर्यंत बारामतीकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. जवळपास पन्नास कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारे हे बसस्थानक हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीच्या विकासाताली एक महत्वाकांक्षी प्रकल्प होता.
सध्याच्या जागेत विस्तारीकरण करुन नवीन जागा जोडून घेत पुढील किमान तीस वर्षांचा विचार करुन हे बसस्थानक स्वताः सातत्याने लक्ष घालून अजित पवार यांनी उभारुन घेतले आहे. या राज्यातील सर्वांगसुंदर अशा बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात असून दस-यापर्यंत सर्व काम पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता रामसेवक मुखेकर यांनी दिली.
बारामतीच्या बसस्थानकावर वाढलेला प्रवाशांचा ताण विचारात घेत नव्या बसस्थानकाची निर्मिती करण्याचा निर्णय घेत सन 2021 मध्ये या कामाला प्रारंभ झाला. दोन वर्षात या सुसज्ज बसस्थानकाची निर्मिती झालेली आहे. आर्किटेक्ट सुनील पाटील यांनी या बसस्थानकाचा आराखडा तयार केलेला असून नाशिक येथील हर्ष कन्स्ट्रक्शन्स या बसस्थानकाची उभारणी करीत आहे. या बसस्थानकावर एकाच वेळेस 22 बसेस फलाटावर उभ्या राहू शकणार आहेत. फर्निचरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

आर्थिकदृष्टया स्वावलंबी बसस्थानक व्हावे या साठी व्यावसायिक तत्त्वावर गाळे देऊन त्यातून देखभाल दुरुस्तीचा खर्च निघावा अशा उद्देशाने बसस्थानकाची रचना करण्यात आली आहे.

अशी असतील वैशिष्टये...

• प्रकाशयोजना चांगली असल्याने वीजेची बचत होणा

• इमारतीत ओपन टू स्काय गार्डन असेल.

• उत्तम कँटीन होणार असून लोकांना निवांतपणे बसता येईल.

• बसस्थानकाला झिंक रुफिंग असून पन्नास वर्षांची त्याची गॅरंटी आहे.

• देखभाल दुरुस्ती कमी लागावी अशा रितीने रचना केली आहे.

• एकाच वेळेस 80 बसेस रात्रीच्या वेळेस उभ्या राहू शकतील.

• नव्या रचनेत इलेक्ट्रीक गाड्या असतील ही बाब विचारात घेऊन त्याचीही तरतूद होणार आहे.

• एकाच वेळेस 22 बस फलाटावर उभ्या राहू शकतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या