आगोदर आपण आपल्या दसुर गावा मधुन ग्रामपंचायत सदस्य होवुन दाखवा व नंतर माळशिरस तालुक्याचं प्रतिनिधित्व करा-अमोल पनासे
प्रतिनिधी सचिन रणदिवे
मो नं 9730093611
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक व राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमांमध्ये राजकीय सेवानिवृत्ती घेण्याचा संकल्प केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवा नेते संकल्प डोळस राष्ट्रवादीचे उमेदवार असणार अशी चर्चा राष्ट्रवादीत सुरू झालेली असल्याने संकल्प डोळस राष्ट्रवादीचा नवा चेहरा असणार अशी बातमी प्रसारित होताच वेळापूर गावचे युवा नेते उत्तमराव जानकर यांचे कट्टर समर्थक युवा नेते अमोल पनासे यांनी माहिती सेवाभावी टाइम्स यांच्याशी बोलताना दिलेली माहिती माळशिरस तालुक्यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेला सत्ताधाऱ्यांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यात उत्तमरावजी जानकर साहेब यांचा मोलाचा वाटा आहे उत्तमराव जानकर साहेब यांनी अनेक निवडणुका लढवल्या अपयश मिळाले तरीही ते खचून न जाता त्याच ताकतीने त्याच जोमाने नव्या उमेदीने पुन्हा ते मैदानात उतरत त्यांनी सर्व सामान्य गोरगरीब कुटुंबातील लोकांना जिल्हा परिषद पंचायत समिती सरपंच ग्रामपंचायत सदस्य अशा अनेक पदावर ती काम करण्याची संधी दिली आहे. नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना घाम फोडला होता त्यामुळे सत्ताधारी लोकांनी किंवा अशा सोशल मीडियावर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी स्वप्नातही विचार करू नये की उत्तमराव जानकर साहेब यांची बरोबरी आपण शकतो ते तसेच अगोदर आपण आपल्या गावातील ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखवा नंतर माळशिरस तालुक्यामध्ये प्रतिनिधित्व करण्याची स्वप्न पहा तसेच
आजपर्यंत उत्तमराव जानकर यांनी माळशिरस तालुक्यामध्ये सत्ताधारी मोहिते पाटील गटाला नेहमीच राजकीय दृष्ट्या मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे असा विरोध करणं म्हणजे माळशिरस तालुक्यामध्ये काही काही लोकांचं सत्ताधाऱ्यांनी जगणं सुद्धा मुश्किल केलेलं आहे? त्यामुळे कोणीही उत्तमराव जानकर साहेब यांची बरोबरी करू शकत नाही करू शकणार नाही हे मात्र सोशल मीडियावरील झळकणाऱ्या नेत्यांनी लक्षात घ्यावे तसेच कोरोनाच्या काळामध्ये उत्तमराव जानकर साहेबांनी दिवस रात्र गोरगरिबांची दवाखाना औषधे अन्नधान्य बँक काढली आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मदत करत असताना जनतेच्या मनात जाऊन काम केली याच धान्य बँकेच्या उद्घाटनला पक्षाचे पक्षप्रमुख श्री शरद पवार साहेब आले होते त्यामुळे जनता आणि पक्षाचे अध्यक्ष कोण उमेदवार हे काळच ठरवेल असेही ते बोलताना म्हणाले.
0 टिप्पण्या