भावी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना सांगोला येथील कार्यक्रमात बसायला खुर्ची मिळाली नसल्याची चर्चा ?

भावी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना सांगोला येथील कार्यक्रमात बसायला खुर्ची मिळाली नसल्याची चर्चा ? 

आशा कर्तृत्ववान भावी खासदाराला भाजप उमेदवारी देईल का ? 

खासदार नाईक निंबाळकर यांच्यावर देवेन्द्र फडणवीस यांची खास आहे मर्जी ! 

प्रतिनिधी :सांगोला : महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री कै.गणपतराव देशमुख यांच्या सांगोला येथील पूर्णाकृती पुतळ्याच्या आणावरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.त्यांच्या हस्ते पुतळ्याचे आणावरण करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे उपस्थित होते.यावेळी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह निंबाळकर,यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते.काही वेळ खासदार रणजितसिंह निंबाळकर,आमदार शाहजी पाटील,यांना बसण्यासाठी स्टेजवर खुर्ची मोकळी नव्हती,थोड्या वेळाने त्यांना बसण्यासाठी खुर्चीची व्यवस्था करण्यात आली.


खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना डीवचण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे विधानपरिषदचे सभापती श्री रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कानात सारखी कुजबुज करीत असल्याचे दिसून आले.त्यामुळे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना वारंवार डीवचण्यासाठी मोहिते पाटील काहीतरी शक्कल लढवत असल्याचे अनेकवेळा सिद्ध झाले असल्याचे पाहायला मिळाले आहे.

मात्र स्वतःला भावी खासदार म्हणून मिळविणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटील यांना कार्यक्रम संपेपर्यंत बसायला खुर्ची मिळाली नाही,अशी कुजबुज सांगोला तालुक्यातील शिवरत्न वरील मोहिते पाटील यांच्या मोजक्या असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये चालू होती.त्यामुळे बसायला खुर्ची न मिळणाऱ्या आणि भावी खासदार होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजप उमेदवारी देईल का ? हाच विषय सांगोला तालुक्यात दिवसभर चर्चेचा बनलेला होता.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेसाठी,तसेच नीरा देवघर च्या कॅनॉल साठी रेल्वे च्या प्रश्नासाठी प्रयत्न केले असल्याचे प्रखरतेने दिसून आले आहे,त्यामुळे भाजप त्यांनाच उमेदवारी देईल आणि मोहिते पाटील यांना त्यांचेच काम करावे लागेल असाच सूर जनतेतून ऐकावयास मिळत आहे.खासदार नाईक निंबाळकर यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची खास मर्जी असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या