चंद्रकांत घुगरदरे प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये विश्वस्त डॉ. नरेंद्र कवितके यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण.

चंद्रकांत घुगरदरे प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये विश्वस्त डॉ. नरेंद्र कवितके यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण.

प्रतिनिधी सचिन रणदिवे 

नातेपुते दि. येथील अक्षय शिक्षण संस्था संचालित चंद्रकांत घुगरदरे प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये अक्षय शिक्षण संस्थेचे विश्वस्त डॉ . नरेंद्र रघुनाथ कवितके यांच्या शुभहस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या शुभहस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. प्रमुख पाहुणे डॉक्टर नरेंद्र कवितके यांनी आपल्या मनोगतात भारत मातेच्या वीर सुपुत्रांच्या त्यागातून हे राष्ट्र उभे राहिले. क्रांतिकारकाच्या त्यागाचे शौर्याचे आपण सदैव स्मरण ठेवले पाहिजे. स्वातंत्र्यानंतर विविध क्षेत्रांमध्ये आपल्या देशाने नेत्रदीपक प्रगती केली आहे भारतीय म्हणून ही अभिमानाची बाब आहे. देशाची एकता आणि अखंडता टिकविण्यासाठी कटिबद्ध राहू या असे सांगितले. प्रशालेचे समर्पित भावनेने काम करणारे विद्यार्थी प्रिय शिक्षक सुखदेव वलेकर यांनी शाळेला व्यायाम शाळा बांधकाम अनुदान स्वच्छतागृह बांधकाम अनुदान जिमचे साहित्य क्रीडा साहित्य मिळवून दिल्याबद्दल अक्षय शिक्षण संस्था पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी पालक विद्यार्थी यांचे वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर अंतर्गत उज्वल लोकसंचालित साधन केंद्र नातेपुते अंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक 1000 कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. समारंभ प्रसंगी विश्वस्त डॉ. नरेंद्र कवितके, हनुमंत धालपे,डॉ विठ्ठल कवितके, नंदकिशोर धालपे, सभासद शशांक घुगरदरे,सुनिता घुगरदरे,शिल्पा घुगरदरे मुख्याध्यापक रवींद्र चांगण, उमेश पोतदार,निहाल मुलाणी,पालक बहुसंख्येने उपस्थित होते. समारंभाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या