युवा नेते सलीम ( भाई)मुलाणी यांची मुस्लिम समन्वय समितीच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी फेरनिवड

युवा नेते सलीम (भाई) मुलाणी यांची मुस्लिम समन्वय समितीच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी फेरनिवड

प्रतिनिधी सचिन रणदिवे


फोंडशिरस गावचे युवा नेते सलीम भाई मुलाणी यांची मुस्लिम समन्वय समिती महाराष्ट्र राज्य माळशिरस तालुकाध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली. यावेळी समितीचे प्रदेशाध्यक्ष रशिदभाई शेख,अस्लमभाई मुजावर ,मुस्लिम जमातचे अध्यक्ष अजिमभाई मुलाणी यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले.

नवनियुक्त तालुकाध्यक्ष सलिम मुलाणी यांचा दांडगा जनसंपर्क व तळागाळापर्यंत पोहचून काम करण्याची चिकाटी यामुळे मुस्लिम समन्वय समितीचे कार्य गावोगावी पोचण्यास मदत होणार आहे. आजपर्यंत समितीने दाखवलेला विश्वासाच्या जोरावर समितीचे ध्येय धोरण व विचार गाव तेथे कार्यकर्ता ची फळी निर्माण करून विविध सामाजिक प्रश्नांना मार्गी लावण्याचे प्रयत्न करू असे मत यावेळी मुलाणी यांनी व्यक्त केले.

यावेळी समितीच्या वतीने नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष सलिमभाई मुलाणी यांचा सत्कार करताना प्रदेशाध्यक्ष रशिदभाई शेख, अजिमभाई मुलाणी, अस्लम मुजावर, रियाज मुजावर, समिर मुलाणी, नशिर मुलाणी, मुबारक तांबोळी, अस्लम मुल्ला, अश्रफ मुल्ला, मोहसिन शेख ,अन्सार पठाण आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या