माळशिरस तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा...अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा..

माळशिरस तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा...
अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा..

प्रतिनिधी /सचिन रणदिवे 

 माळशिरस तालुक्यातील गेल्या तीन महिन्यापासून पाऊस झालेला नाही. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून तसेच जनावरांच्या ही चाऱ्याचा प्रश्न फार गंभीर झाला आहे त्यामुळे सध्या तालुक्यात पाण्याची व चाऱ्याची टंचाई,निर्माण झालेली आहे. आज तागायत प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली दिसून येत नाही. शासनाने गेल्या सहा महिन्यापासून शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळत नाही. तसेच तालुक्या त ठीक ठिकाणी चारा डेपो सुरू करावेत अशा अनेक समस्यांचे निवेदन आज स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले प्रशासनाने जर योग्य वेळी दखल घेतली नाही तर तहसीलदारांना घेराव घालून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू अशा आशेचे निवेदन स्वाभिमानी चे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी शेतकरी नेते सोमनाथ वाघमोडे,भानुदास पाटील, डॉ सचिन शेंडगे,अजय सकट, दत्ता भोसले, साहील आतार, राजेश खरात,दादा काळे, समाधान काळे, तेजस भाकरे, सचिन बोरकर, यांसह पदाधिकारी उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या