भाजपच्या शेतकऱ्यांच्या विषयीच्या योजना फसव्या : लक्ष्मण हाकेहोऊ दे चर्चा अंतर्गत तालुक्यात शेतकऱ्यांशी चर्चा

भाजपच्या शेतकऱ्यांच्या विषयीच्या योजना फसव्या : लक्ष्मण हाके
होऊ दे चर्चा अंतर्गत तालुक्यात शेतकऱ्यांशी चर्चा 
प्रतिनिधी -माळशिरस 
भारतीय जनता पार्टीच्या शेतकऱ्यांविषयीच्या असणाऱ्या सर्व योजना या फसव्या असून सर्व स्तरातून शेतकऱ्यांची फक्त आणि फक्त पिळवणूक होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्याचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी आज माळशिरस तालुक्यातील मळोली व तांदुळवाडी या ठिकाणी बोलताना केला. केंद्र व राज्य शासनाच्या फसव्या योजनांचा भांडाफोड करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली होऊदे चर्चा अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधायला राज्याचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी सुरुवात केली असून आज ते माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावरती होते यावेळी त्यांनी तांदूळवाडी व मळोली या ठिकाणी ग्रामस्थ शेतकरी दूध उत्पादक ऊस उत्पादक कष्टकरी शेतमजूर त्याचबरोबर छोटे मोठे व्यावसायिक यांच्यासोबत विविध विषयांवर संवाद साधला.

यावेळी एक रुपया मध्ये पिक विमा या योजनेबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करताना हजारो शेतकऱ्यांनी फॉर्म भरूनही या दुष्काळी परिस्थितीत कोणत्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळाल्या नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं तर एक रुपयांनी दूध दर वाढवला मात्र एस एन एफ द्वारे शेतकऱ्यांची पिळवणूक सुरूच असल्याचं दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलं त्याचबरोबर एफआरपी न देता फक्त शोषण व काटामारी या दोनच योजना साखर कारखान्यांकडून सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या होऊदे चर्चा अंतर्गत नेतेमंडळींसमोर स्पष्ट केलं.

त्याचबरोबर युरिया लिंकिंग द्वारे इतर खतांची गोण्या घेतल्या तरच युरिया मिळेल असा युरियाचा सर्रास काळाबाजार कृषी मंत्र्यांच्या आशीर्वादाने माळशिरस तालुक्यात सुरू असल्याचेही यावेळी बोलताना शेतकऱ्यांनी सांगितलं तर जनधन खात्याची फसवी योजना याबाबत ही होऊदे चर्चा अंतर्गत शेतकऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांच्यासोबत चर्चा केली.

माळशिरस तालुका हा ऊस उत्पादकांचा तालुका म्हणून संपूर्ण राज्यात ओळखला जातो मात्र यंदा पावसाने दडी मारल्याने पाण्याची मोठी टंचाई झाली असून यामुळे यावर्षीचा उसाचा गळीत हंगाम लवकरात लवकर सुरू व्हावा पाणीटंचाई व वाढते तापमान लक्षात घेता उन्हाळ्यामध्ये उसाचे पीक जगणं मुश्कील असल्याचे मत यावेळी शेतकऱ्यांनी प्रवक्ते लक्ष्मण हाके यांच्यासमोर मांडले.

शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारचा या ठिकाणी चांगला समाचार घेतला केंद्राच्या व राज्याच्या शेतकऱ्यांविषयीच्या असणाऱ्या सर्व योजना फसव्या असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला तर या सरकारला फक्त आणि फक्त शेतकऱ्यांमधून शोषण करून महसूल गोळा करायचा आहे असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला आहे.

यावेळी माळशिरस तालुकाप्रमुख संतोष राऊत, उपतालुकाप्रमुख डॉ निलेश कांबळे, शहरप्रमुख अरुण मदने, अनिल बंदपट्टे, शिवसैनिक बाबूलाल तांबोळी, लक्ष्मण डोईफोडे, उमेश जाधव, प्रा सतीश कुल्हाळ, संदीप कदम, शाखाप्रमुख आप्पासाहेब कांबळे, दत्ता काशीद, धनाजी कदम, शिवसैनिक महेश कदम, कांतीलाल कदम, योगेश काकडे, नामदेव मिले, अशोक मिले, भारत कदम, नाना दुधाट, दादा जाधव, शिवाजी चव्हाण, रोहित जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट : शिवसेनेसोबत सर्व पक्षांचा शेतकऱ्यांच्या सुरात सूर ! 
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच वंचित बहुजन आघाडी, शेतकरी संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटना यांनीही होऊदे चर्चा अंतर्गत शेतकऱ्यांसोबत फसव्या योजनांवर बोलताना चर्चेत सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या