गौरी- गणेशोत्सवानिमित्त श्री.प्रशांत शिंदे पाटील मा संचालक माळेगाव सहकारी साखर कारखाना यांच्या हस्ते लाभार्थी ना आर डी गजाकस यांच्या कडून आनंदाचा शिधा वाटप करण्यास सुरुवात...!

 गौरी- गणेशोत्सवानिमित्त  श्री.प्रशांत शिंदे पाटील मा संचालक माळेगाव सहकारी साखर कारखाना यांच्या हस्ते लाभार्थी ना आनंदाचा शिधा वाटप...!



बारामती 
बारामती गौरी-गणेशोत्सवानिमित्त १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देण्याचा राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा शहरातील ८६ हजार ५०९ शिधापत्रिकाधारकांना लाभ मिळणार.यामध्ये एक किलो रवा, एक किलो हरभरा डाळ एक किलो साखर व एक लिटर खाद्य तेलाचा यामध्ये समावेश आहे.सणासुदीच्या काळात १०० रुपयांत आनंदाचा शिधा मिळणार असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार असल्याने आनंदाच्या शिधामुळे काहीअंशी वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्याला दिलासा मिळणार आहे. 


गौरी-गणपती सणानिमित्त 'आनंदाचा शिधा'चे  वितरण करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्हानिहाय लाभार्थ्यांची यादी निश्चित करण्यात आली आहे. त्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ५ लाख ६२ हजार ७९५ शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा किटचे वाटप केले जाणार आहे. ई-पॉसद्धारे रास्त धान्य दुकानांमधून याचे वितरण केले जाणार आहे. याबाबतच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने जिल्हा प्रशासनास सूचना दिल्या आहेत. बारामती तालुक्यात तब्बल ८६ हजार ५०९ लाभार्थ्यांना अवघ्या शंभर रुपयात आनंदाचा शिधाचे वाटप करण्यात येणार आहे.

बारामती शहरातील स्वस्त धान्य दुकान आर.डी.गजाकस श्री प्रशांत शिंदे पाटील मा संचालक माळेगाव सहकारी साखर कारखाना यांच्या हस्ते लाभार्थी ना आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी लाभ घेणारे लाभार्थी व श्री नवनाथ गजाकस उपस्थित होते.

बातमी चौकट
बारामती तालुक्यात ८६ हजार ५०९ शिधापत्रिकाधारक कुटुंब आहेत. त्यापैकी अंत्योदय शिधा लाभधारक ७ हजार ९४५ व प्राधान्य कुटुंब लाभार्थी ७८ हजार ५६४ याप्रमाणे ८३ हजार ९५० कुटुंबांना तहसीलदार गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील २२० रेशन दुकानदाराच्या माध्यमातून आनंदाचा शिधाचे वाटप करण्याचे नियोजन केले आहे.

 लक्ष्मण माने, पुरवठा निरीक्षण अधिकारी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या