स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दणक्यात बांधकाम विभागाला आली जाग

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दणक्यात बांधकाम विभागाला आली जाग
पिसेवाडी येथील भाकरे वस्ती या ठिकाणच्या शाळेमध्ये बसवलेली फरशी घेतली बदलून
प्रतिनिधी सचिन रणदिवे
मो नं 9730093611


मौजे पिसेवाडी या ठिकाणी भाकरे वस्ती तालुका माळशिरस येथील जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती करण्याचे काम सुरू होते सदर काम हे इस्टिमेट प्रमाणे झाले नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस विधानसभेतचे प्रमुख साहिल आतार यांनी बांधकाम विभागाचे भुमकर साहेब व उपअभियंता यांच्या लक्षात आणून दिले सदर काम हे इस्टिमेट प्रमाणे झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी ही मान्य केले त्यानंतर संबंधित ठेकेदार यांना सदर काम हे इस्टिमेट प्रमाणे झाले तरच तुमचे बिल अदा केले जाईल असे संबंधित अधिकारी यांनी ठेकेदाराला सांगितले काम हे पुन्हा इस्टिमेट प्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने करून घेतले सदर काम हे पुर्ण झाले आहे यामुळे इथून पुढील काळामध्ये पिसेवाडी गावामध्ये भ्रष्टाचाराला कधीच पाणी घातले जाणार नाही व भ्रष्टाचार करणाऱ्याला मोकळे सोडणार नाही असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधानसभा प्रमुख साहिल आतार यांनी ठणकावून सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या