महाराष्ट्रात आणखी एका पक्षाची भर किरण साठेंनी केली महाराष्ट्र विकास सेना पक्षाची स्थापना

महाराष्ट्रात आणखी एका पक्षाची भर

किरण साठेंनी केली महाराष्ट्र विकास सेना पक्षाची स्थापना

प्रतिनिधी : सोलापूर : सोलापूर येथील श्रमिक पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विकास सेना पक्षाची स्थापना १/५/२३ रोजी करण्यात आली आहे.त्यानंतर नोंदणी करण्यात आली आणि दिनांक ११/९/२३ रोजी पक्षाचे नोंदणी प्रमाणपत्र मिळाले असल्याची माहिती पक्ष प्रमुख किरण साठेंनी दिली.


पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील,शेतकरी,महिला,सुशिक्षित बेरोजगार,तसेच विविध प्रकारच्या क्षेत्रातील,कर्मचारी आणि सर्वसामान्य जनता यांच्या प्रश्नासाठी काम केले जाणार आहे.महाराष्ट्रातील राजकारणाचा झालेला बट्याबोळ आणि राजकारणामध्ये काम करू पाहणाऱ्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांची होरपळ झालेली आहे
महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये ज्याप्रमाणे अवस्था निर्माण झालेली आहे त्या अवस्थेमध्ये सर्वसामान्य जनता अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळत आहे या राजकारणाचा संबंध सर्वसामान्य जनतेच्या प्रत्येक गोष्टीशी निगडित असतो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा झालेला बट्ट्याबोळ आणि महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीने नेण्यासाठी तसेच महाराष्ट्रामध्ये य राजकारणाच्या झालेल्या परिस्थितीला बदलविण्यासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करण्याच्या उद्देशाने या महाराष्ट्र विकास सेना पक्षाची स्थापना करण्यात आली असल्याचे पक्ष प्रमुख किरण साठेंनी सांगितले.


 महाराष्ट्र मध्ये शेतकरी महिला सुशिक्षित बेरोजगार तसेच सर्वसामान्य जनता यांना मोठ्या प्रमाणात महागाईला सामोरे जावे लागत असून त्यांचे दैनंदिन जीवन कोलमडले असल्याने या महाराष्ट्रातील जनतेचा आवाज म्हणून त्यांना न्याय देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून काम केले जाणार आहे.महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून राज्यातील बुचकळ्यात पडलेल्या आणि राजकारणामध्ये येण्यासाठी इच्छुक असलेल्या युवकांना या पक्षाच्या माध्यमातून संधी देऊन महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवरती नेण्यासाठी हा पक्ष कटिबद्ध राहणार आहे. महाराष्ट्र विकास सेना पक्ष संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवण्यासाठी थोड्याच दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यव्यापी दौरा आखण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्याचा विकास करण्याच्या मुख्य हेतूने या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे.राजकारणात ज्यांना स्वतःच भवितव्य आजमावायचे आहे,समाजाची सेवा करायची आहे,महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोलाचा योगदान द्यायचं आहे त्या सर्वांनी महाराष्ट्र विकास सेनेमध्ये सामील होऊन आपल्याकडे असलेल्या,अभ्यासाचा,कल्पनाचा, विचारांचा योग्य तो वापर करून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र विकास सेनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन किरण साठेंनी पत्रकार परिषदेत केले आहे.किरण साठेंनी नवीन पक्ष स्थापन केल्याने महाराष्ट्रात आणखी एका पक्षाची भर पडली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या