पुढच्या वर्षीपासून दहीहंडी मैदानातच साजरी होणार; उच्च न्यायालयाचे निर्देश ...!
मुंबई : दरवर्षी महाराष्ट्रात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षीही राज्यात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा होत आहे. अशात राजकीय नेत्यांनी दहिहंडी कार्यक्रमांची जोरदार तयारी केली आहे. तर दुसरीकडे, उच्च न्यायालयाने यासंबंधी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. मुंबईमध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सारखा मोठ्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागते. परंपरा आणि संस्कृतीमुळे वर्षानुवर्षे सुरू असलेल्या परंपरा आता कुठेतरी बदलायला हव्यात. त्यासाठी नवीन धोरणच निश्चित करण्याची आवश्यकता आहे. हे धोरण असं तयार करा की सण उत्सवांमुळे वाहतूककोंडी होणार नाही, गर्दी होणार नाही, नागरिकांना त्रास होणार नाही. निदान पुढील वर्षी तरी दहीहंडी उत्सवाआधी हे धोरण निश्चित करा. असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. दहिहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या मंडळाची व गोविंदांची संख्याही आता कमी करायला हवी. आज पाच हजार जण सहभागी होत आहेत. पुढे जाऊन ही संख्या ५० हजारांवर जाईल. याला कुठे तरी आळा बसायलाच हवा. त्यामुळे किमान १० ते ५० मंडळेच सहभागी होऊ शकतील, असा नियम करा. मंडळांमध्ये किती गोविंदा असावेत यावरही निर्बंध आणा. वेळेचंही निर्बंध आणा. जेणेकरून गर्दी होणार नाही. दहिहंडी उत्सव आयोजित करणाऱ्या एकाच आयोजकाला दिवसभर परवानगी देऊ नका. सहा तास एका आयोजकाला द्या. पुढील सहा दुसऱ्या आयोजकाला द्या. जेणेकरून सर्वांना मोक्याच्या ठिकाणी सण साजरा करण्याची संधी मिळेल. उत्सव साजरा झाल्यानंतर संबंधित जागा साफसफाई करण्याची जबाबदारी त्या मंडळाची असेल, असाही नियम असेही न्यायालयानं नमूद केलं आहे.
0 टिप्पण्या