बारामती एग्रीकल्चरच्या कृषीकन्यांचे जल्लोषात स्वागत..

बारामती एग्रीकल्चरच्या कृषीकन्यांचे जल्लोषात स्वागत..


प्रतिनिधी सचिन रणदिवे 
मो नं 9730093611

माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे डॉ शरदचंद्रजी कृषी महाविद्यालय बारामती येथील कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनी या परिसरात शेती अभ्यासासाठी दाखल झालेल्या आहेत मारकडवाडी ग्रामस्थ शेतकरी बंधू भगिनी यांनी कृषकन्यांचे स्वागत केले त्यानंतर विद्यार्थिनींनी गावातील ग्रामपंचायत,चावडी, अंगणवाडी,प्राथमिक शाळा यांना भेट देऊन माहिती जाणून घेतली 
मारकडवाडी तालुका माळशिरस परिसरातील कृषी अभ्यासाकरिता आलेल्या कृषी कन्या मध्ये दिपाली गावडे, सायली पारखी, साक्षी गोलेकर,गौरी गाडेकर, सोनिया पवार, प्रीती ताटे, मोनिका गोलवी सहभागी आहेत येथे दहा आठवडे वास्तव्य करणार आहेत यावेळी परिसरातील शेतकऱ्यांना व नागरिकांना शेती पद्धती व पीक प्रात्यक्षिकाची माहिती शेतकऱ्यांना वित्तीय पुरवठा करणारे सोसायटीचे कार्य कशा पद्धतीने चालते हे समजून सांगण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,सदस्य, ग्रामसेवक व शेतकरी यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या