बारामती येथील PWD अधिकाऱ्यांचे होणाऱ्या विकासाच्या कामावर दुर्लक्ष.....!

बारामती येथील PWD अधिकाऱ्यांचे होणाऱ्या विकासाच्या कामावर दुर्लक्ष.....

दिनांक:-२३/११/२०२४
 बारामती हे नाव ऐकले असता विकास म्हणून ओळखले जाते. अशा विकास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती मध्ये पीडब्ल्यूडी च्या अधिकाऱ्यांकडून कामावर दुर्लक्ष होत असलेले दिसून येत आहे. 

मळद गावातून नुकतेच चालू असलेले रस्त्याच्या विकासाचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जांनी होत असून त्याच्यावर अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. या अधिकाऱ्यांना नागरिकांनी संपर्क साधून वेळोवेळी सूचना व माहिती देऊन सांगितले असता ही त्याच्याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे.
रस्त्याचे काम हे निकृष्ट होऊ किंवा चांगले हो याच्यावर लक्ष न देता आपली टक्केवारी कशी मिळेल याच्यावर यांचे जास्त लक्ष असते अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना नागरिकांनी संपर्क साधला असता कोणत्याही प्रकारे प्रतिसाद न देता मुजोरीपणाने त्याच्यावर दुर्लक्ष केले जाते. 


कोणतेही रस्त्याचे कार्य होत असताना संबंधित अधिकारी ते कार्य पूर्ण होत असताना त्यांच्या देखरेखीखाली करणे आवश्यक असते. रोडची साईड पट्टी योग्यरित्या न भरल्याने होणाऱ्या अपघातात संबंधित पीडब्ल्यूडी चे अधिकारी जबाबदार राहतील. लवकरच नागरिक याची वरिष्ठांकडे तक्रार करून दखल घेण्यास लेखी निवेदन करणार आहेत. व अशा अधिकाऱ्यांवर शासकीय सेवा अधिनियमाद्वारे कारवाई करून मागणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या