“लाचखोर पकडले… पण मुळं जिवंत!”
पुणे ACB कारवाईंचा आढावा की अपयशाचा अहवाल ?
पुणे | विशेष तपास अहवाल
पुणे अँटी करप्शन ब्युरो (ACB) यंदा सातत्याने लाचखोर सरकारी अधिकारी पकडत असल्याचे चित्र जरी बाहेरून दाखवले जात असले, तरी या कारवायांचा खोलवर अभ्यास केला असता एक गंभीर आणि अस्वस्थ करणारी वस्तुस्थिती समोर येते — “मोठे मासे सुटतात आणि लहान मासे जाळ्यात अडकतात” हा जुना पॅटर्न अजूनही बदललेला नाही.
◼️ मोठ्या लाचेचे प्रकरण, पण तपास कुठे थांबतो?
याच वर्षी पुण्यात ₹8 कोटींच्या लाचेची मागणी करणाऱ्या लिक्विडेटर व ऑडिटरला ACB ने अटक केली. कारवाई गाजली. फोटो झळकले. प्रेस नोट निघाली.
पण प्रश्न उभा राहतो —
▪️₹8 कोटींची लाच एका व्यक्तीसाठी होती की संपूर्ण साखळी होती?
▪️या रकमेच्या मागे असलेले राजकीय, प्रशासकीय संरक्षक कोण?
▪️फक्त पैसे घेताना पकडले, पण फायदा कोणाला होणार होता याचा तपास कुठे गेला?
आजही या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळालेली नाहीत.
◼️ शिक्षण, पोलीस, महसूल – सगळीकडेच दलाली
याच वर्षात —
▪️शिक्षण विभागातील उपनिरीक्षक शिक्षकाकडून ₹1 लाख घेताना पकडला जातो.
▪️पोलीस उपनिरीक्षक कोट्यवधींची लाच मागतो.
▪️महिला मंडळ अधिकारी, महसूल कर्मचारी हजारो–लाखांची लाच घेताना अडकतात.
▪️हे सगळे अधिकारी स्वतःहून लाचखोर झाले का ?
▪️की सिस्टमनेच त्यांना “रेट कार्ड” शिकवले ?
▪️ACB मात्र प्रत्येक वेळी “स्वतंत्र प्रकरण” म्हणून हात झटकते.
◼️ पुणे – लाच प्रकरणांची राजधानी?
ACB च्याच आकडेवारीनुसार यंदा महाराष्ट्रात सर्वाधिक लाच प्रकरणे पुण्यात नोंदली गेली.
याचा अर्थ काय?
▪️पुणे अधिकारीच सर्वाधिक भ्रष्ट ?
▪️की पुण्यातच ACB कार्यक्षम ?
▪️की पुण्यातील भ्रष्टाचार इतका खोलवर आहे की ACB ला फक्त टोक दिसते, मुळं नाहीत ?
हे ही वाचा
◼️ जमीन घोटाळे आणि ACB ची रहस्यमय शांतता
पुण्यातील जमीन व्यवहारांवरून —
▪️राजकीय नेते,
▪️सामाजिक कार्यकर्ते,
▪️माजी न्यायाधीश यांनी खुलेआम भ्रष्टाचाराचे आरोप केले.
मग प्रश्न असा की — जेव्हा हजारो कोटींचे जमीन व्यवहार संशयास्पद ठरतात, तेव्हा ACB कुठे असते? लाच ₹25 हजार असली की ट्रॅप,
पण जमीन घोटाळे झाले की ACB गायब का?
◼️ अटक होते, शिक्षा होत नाही — हीच खरी समस्या
ACB कडून दरवर्षी डझनावधी अटक होते.
पण —
▪️दोषसिद्धीचा दर अत्यंत कमी
▪️वर्षानुवर्षे खटले प्रलंबित
▪️आरोपी पुन्हा त्याच किंवा दुसऱ्या पदावर
म्हणजे ACB ची कारवाई ही भ्रष्टाचार निर्मूलनासाठी नसून आकडेवारीसाठी आहे का?
❗ जनतेचा थेट सवाल
आज पुण्यातील सामान्य नागरिक विचारतो आहे —
▪️ “ACB खरंच भ्रष्टाचार संपवत आहे,
की फक्त नाटक करत आहे?” जोपर्यंत —
▪️वरिष्ठ अधिकारी,
▪️राजकीय हस्तक्षेप,
▪️फायनल लाभार्थी यांच्यावर हात टाकला जात नाही,
तोपर्यंत लाचखोरी थांबणार नाही
आणि ACB वरचा विश्वासही टिकणार नाही.
🧨ACB ला आज गरज आहे —
▪️स्वतःच्या कामगिरीचा आत्मपरीक्षण अहवाल जाहीर करण्याची
▪️मोठ्या प्रकरणांवर स्वतंत्र SIT स्थापण्याची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे“ कोणाचीही भीड न बाळगता तपास” करण्याची नाहीतर, “लाचखोर पकडले” या बातम्यांपेक्षा “भ्रष्टाचार का संपत नाही?”
हा प्रश्न अधिक बोचरा ठरेल.

0 टिप्पण्या