🔥 “भरारी पथक की हफ्तेखोर टोळी ? जेजुरी–सासवड, वडगाव , मोरगाव पट्ट्यात ‘काका यादव’चा उघड उघड धुमाकूळ” 🔥
यादव, इंगळे आणि गायकवाड : भरारी पथकाच्या (महाराष्ट्र राज्य)नावावर हप्तेखोरीचा थेट आरोप!
जेजुरी–सासवड पट्ट्यात अवैध दारू माफियांना संरक्षण देणारी नावे उघड..!
जेजुरी | विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाच्या नावाखाली सुरू असलेली हप्तेवसुलीची यंत्रणा आता उघडकीस येत असून, यादव नावाचा व्यक्ती जेजुरी, वडगाव निंबाळकर, सासवड, मोरगाव परिसरात अवैध दारू धंद्यांचा “अघोषित सम्राट” म्हणून वावरत आहे.महाराष्ट्रात अवैध दारूवर कारवाईसाठी स्थापन केलेल्या भरारी पथकाचे नाव जर हप्तेवसुलीचे ‘कव्हर’ म्हणून वापरले जात असेल, तर ही केवळ अनागोंदी नाही, तर संस्थात्मक भ्रष्टाचाराचा स्फोट असल्याचे चित्र पुणे जिल्ह्यात समोर येत आहे.( या बातमी मधील इंगळे आणि गायकवाड म्हणजे दुय्यम निरीक्षक सतीश इंगळे आणि दुय्यम निरीक्षक शहाजी गायकवाड हे आहेत.)
◾हातभट्टीपासून हॉटेलपर्यंत हफ्त्यांचे जाळे
यादव हा व्यक्ती अवैध हातभट्टी दारू विक्री, अवैध दारू निर्मिती केंद्र, अवैध देशी–विदेशी दारू विक्री परवानाधारक वाईन शॉप, बार, बिअर शॉपी, ताडी परवानाधारक आणि अवैध,परवानाधारक देशी दारू दुकाने यांच्याकडून दरमहा हप्ते राजरोसपणे गोळा करत असून विशेष म्हणजे, ही वसुली लपूनछपून नव्हे, तर उघड उघड दहशतीने केली जात आहे.
“मला साहेबांनीच ठेवले” – यादवचा खळबळजनक दावा
“मला पूर्वी इंगळेंनी ठेवले, आत्ता गायकवाडांचे काम करतो”
या आरोपांपेक्षा अधिक खळबळजनक बाब म्हणजे, यादव स्वतःच आपली ‘ओळख’ उघड करत आहे. यादवला हप्तेवसुलीबाबत विचारले असता तो स्पष्टपणे म्हणतो: “मला MSFS चे पूर्वीचे इंगळे यांनी मासिक हप्ते गोळा करण्यासाठी ठेवले होते. सध्या मी गायकवाड साहेबांचे काम पाहतो.”
गायकवाड यांचा दावा सर्व खोटे आहे तर...
यादव अजून मोकळा का फिरतोय ? त्याच्यावर सरकारी अधिकाऱ्यांची नावे वापरल्याबद्दल गुन्हा का दाखल नाही ?
ही बाब खरी असेल्याने आणि त्यांचा सहभाग असल्याने ,इंगळे आणि गायकवाड साहेब यांची तात्काळ चौकशी का होत नाही ? भरारी पथकाचा वापर वसुलीसाठी कोणी, कधी, कसा केला ?
◾ हप्ते नाही दिले तर ‘भरारी’ची धडक ?
स्थानिक व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, यादवचा ठरलेला डायलॉग आहे , “हप्ता वेळेत दिला नाही, तर भरारी पथकाची कारवाई लावून देईन.” याच भीतीमुळे अवैध दारू धंदे निर्भयपणे सुरू असून, परवानाधारक दुकानदारही नाक दाबून तोंड उघडण्यास भाग पाडले जात आहे. “मला MSFS चे तत्कालीन दुय्यनिरीक्षक सतीश इंगळे सध्या मुंबई येथील एस १ या बिट मध्ये कार्यरत यांनी मासिक हप्ते गोळा करण्यासाठी ठेवले होते. त्यानंतर आता आलेले गायकवाड साहेब म्हणजे इंगळे यांच्या जागी MSFS ला आलेलेदुय्यम निरीक्षक शहाजी गायकवाड यांच्या काळातही मीच हे काम करत आहे. भरारी पथकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट संमती किंवा मौन सहमती असल्याशिवाय असे धाडस शक्यच नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
◾भरारी पथक की संरक्षण कवच?
परवानाधारक व्यावसायिकांकडून हप्ते घेऊन पिळवणूक होत असल्याचे आरोप असताना, यादवसारखा एजंट मुक्तपणे वावरतो, यावरून गायकवाड यांची यास संमती आहे का ?
की उत्पादन शुल्क विभागातच “हफ्ते-सेटिंग”चे साखळीकरण झाले आहे ?
ACB पुणे यांना याची माहिती आहे का, की यंत्रणाच गप्प आहे ? असे अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित होत आहेत.
▪️काका यादवला इतका आत्मविश्वास कुठून ?
▪️काका यादव – एजंट नव्हे, तर “व्यवस्थेचा उघडा चेहरा”
प्रश्न साधे पण अत्यंत गंभीर आहेत: यादव कोणत्या अधिकाराने स्वतःला भरारी पथकाचा प्रतिनिधी म्हणून मिरवतो?
त्याच्याकडे अधिकृत आदेश, ओळखपत्र किंवा नियुक्तीपत्र आहे का? महिन्याला लाखोंची वसुलीचा पैसा नेमका कोणाच्या खिशात जातो ? यादव हा केवळ एक नाव नाही, तर उत्पादन शुल्क व्यवस्थेवर लागलेला प्रश्नचिन्ह आहे. जर एका व्यक्तीला इतक्या मोठ्या परिसरात हफ्ते गोळा करण्याचे धाडस होत असेल, तर मागे कोणाचा हात आहे, याचा शोध राज्याला घ्यावाच लागेल.
◾ACB व उत्पादन शुल्क विभाग झोपेत?
जेजुरी–सासवडसारख्या संवेदनशील पट्ट्यात इतक्या उघडपणे हप्तेवसुली सुरू असेल, तर स्थानिक ACB पोलीस, उत्पादन शुल्क विभाग, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांना याची माहिती नाही, हे मानणे म्हणजे जनतेच्या बुद्धीचा अपमान ठरेल.
◾थेट मागण्या – आता टाळाटाळ नको
या प्रकरणात आता केवळ चौकशी नव्हे, तर तत्काळ कृतीची मागणी होत आहे:
यादवची तात्काळ चौकशी व चौकशीअंती अटक.
इंगळे व गायकवाड साहेब यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी.
यादवचे कॉल रेकॉर्ड (व्हॉईस, व्हॉट्स अप) , आर्थिक व्यवहार आणि संपर्क साखळी जाहीर करणे
भरारी पथकाच्या नावाचा गैरवापर झाल्याबद्दल कठोर कारवाई.
▪️यादव एकटा नाही – तो फक्त पुढचा चेहरा आहे
▪️यादव–गायकवाड प्रकरण म्हणजे फक्त दोन नावे नाहीत…
आज यादव चर्चेत आहे, उद्या आणखी नावे बाहेर येतील.
कारण यादव हा फक्त एक चेहरा आहे; मागे संपूर्ण सिस्टीम उभी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. भरारी पथक जर हप्तेखोरीचे साधन बनले असेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा तरी कुणाकडे ? हा प्रश्न आता थेट महाराष्ट्र सरकारसमोर उभा ठाकला आहे. हे उत्पादन शुल्क विभागाच्या विश्वासार्हतेवर पडलेले काळे डाग आहेत. जर आजही कारवाई झाली नाही, तर उद्या जनता विचारेल , दारू माफिया चालवतोय की सरकारी अधिकारी ?
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्याचे भरारी पथक अन्य भागात वसुली करणारे एजंट यांची नावे शोधून पुराव्यासहित जनतेसमोर आणली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


0 टिप्पण्या