🔥 अँटी करप्शनच्या नावावर हप्ता ? 🔥
पिंपरी-चिंचवड राज्य उत्पादन शुल्क विभागात खळबळ – उपाधीक्षकांभोवती गंभीर आरोप, चौकशीची जोरदार मागणी...!
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागातील पिंपरी-चिंचवड येथे कार्यरत असलेले उपाधीक्षक सुजित पाटील यांच्याविरोधात अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप समोर येत असून, “अँटी करप्शन”च्या नावाखाली १८ विभाग आणि ३ भरारी पथक असे एकूण २१ विभागातून प्रत्येकी १५ हजार रुपये गोळा केले जात असल्याची चर्चा सध्या विभागात खळबळ उडवून देणारी ठरत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पैसे थेट न घेता एका कर्मचाऱ्यामार्फत गोळा केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकारात अँटी करप्शनचे नाव वापरले जात असल्याने हा प्रकार अधिकच संशयास्पद ठरत आहे.
◾अँटी करप्शनचा स्पष्ट नकार
या प्रकरणाबाबत अँटी करप्शनचे उपाधीक्षक श्री. दयानंद गावडे पुणे यांना विचारले असता त्यांनी ठाम शब्दांत सांगितले की,
“आम्ही कोणत्याही प्रकारे हप्ते घेत नाही किंवा अशा कुठल्याही गोळा करण्यात आमचा सहभाग नाही.”
हा स्पष्ट नकार समोर आल्यानंतर अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत—
◾मग हप्ते नेमके कोणासाठी?
जर अँटी करप्शन कोणतेही पैसे घेत नसतील, तर
▪️उपाधीक्षक सुजित पाटील अँटी करप्शनचे नाव घेऊन पैसे का गोळा करत आहेत?
▪️हे पैसे स्वतःच्या फायद्यासाठी गोळा केले जात आहेत का?
▪️की कोणत्यातरी खोट्या दबाव यंत्रणेचा वापर करून कर्मचाऱ्यांकडून वसुली केली जात आहे?
जर हे पैसे वैयक्तिक फायद्यासाठी घेतले जात असतील, तर तो भ्रष्टाचार तर आहेच, पण त्याहून गंभीर म्हणजे अँटी करप्शनसारख्या संस्थेची बदनामी करण्याचा प्रकार ठरतो.
◾ कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
या कथित वसुलीमुळे विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि दबावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचेही बोलले जात आहे. “नाव अँटी करप्शनचं आहे” या कारणामुळे अनेकजण तक्रार करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे.
◾ACB सतर्कता चौकट (Vigilance Alert)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) या प्रकरणात तातडीने पुढील बाबी तपासणी करणे आवश्यक :
▪️ उपाधीक्षक सुजित पाटील हे कोणाच्या आदेशावर पैसे गोळा करत आहे आणि का?
▪️ मागील काही महिन्यांत प्रत्येक विभागातील अधिकारी वर्गाकडून रक्कम, कोणाकडे आणि का जमा झाली ?
▪️ “अँटी करप्शन”चे नाव वापरून दबाव किंवा धमकी देण्यात का आली ?
▪️ वसूल झालेल्या रकमेचा आर्थिक मागोवा (Money Trail)
▪️ संबंधित कर्मचाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड, व्हॉट्सॲप संदेश, आर्थिक व्यवहार
▪️ अँटी करप्शन संस्थेचे नाव वापरण्याची परवानगी सुजित पाटील यांनी कोणाचा आश्रय आहे का ?
ACB ने या प्रकरणात सापळा (Trap) कारवाई किंवा गोपनीय चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
◾ 🚨 ACB चे खुले आव्हान 🚨
“जर कोणी मुजोरपणे हफ्ते मागत असेल,
तर जनतेने निर्भयपणे समोर येऊन तक्रार द्यावी.
तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवून
आम्ही 100% ठोस रिझल्ट देऊ.”
-------- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB)-------


0 टिप्पण्या