एसीबीच्या नावावर हप्तेवसुलीचा धक्कादायक प्रकार उघड! उपाधीक्षक सुजित पाटील व दुय्यम निरीक्षक रोहित माने यांच्याविरुद्ध ठोस पुरावे प्रकरणाला गंभीर वळण..... ?

एसीबीच्या नावावर हप्तेवसुलीचा धक्कादायक प्रकार उघड! उपाधीक्षक सुजित पाटील व दुय्यम निरीक्षक रोहित माने यांच्याविरुद्ध ठोस पुरावे प्रकरणाला गंभीर वळण.....?


पुणे : पुणे येथील  महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क मध्ये कथित मासिक हप्तेवसुली प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणात उपाधीक्षक सुजित पाटील व निरीक्षक रोहित माने यांनी “अँटी करप्शन”च्या नावाचा आधार घेत परवानाधारकांकडून हप्ते गोळा केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, यासंदर्भातील पुरावे तक्रारदाराकडे असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात हप्ते गोळा करण्यामागे एसीबीकडून कारवाई टाळण्यासाठी “व्यवस्था” केली जात असल्याचा समज मुद्दाम निर्माण करण्यात आला होता. काही परवानाधारकांना असे सांगण्यात येत होते की, गोळा होणाऱ्या रकमेपैकी दरमहा १५,००० रुपये प्रत्येक विभागाकडून “अँटी करप्शनसाठी” दिले जात आहेत. या प्रकरणामुळे Anti Corruption Bureau (ACB) च्या नावाचाच गैरवापर करण्यात आल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान रोहित माने यांनी स्वतः दिलेला कथित कबुली जबाब आणि हप्ते गोळा करण्यासाठी वापरल्या गेलेल्या व्यक्तीचे जबाब यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. या जबाबांमध्ये सुजित पाटील यांच्या सांगण्यावरूनच हप्ते गोळा करण्यात येत असल्याचा उल्लेख असल्याची चर्चा विभागात रंगली आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, हप्ते गोळा करून “एसीबी मॅनेज केली जाते” असा समज निर्माण करण्यात आला होता. यामुळे केवळ परवानाधारकांची दिशाभूल झाली नाही, तर Anti Corruption Bureau (ACB) ची प्रतिमाही मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला जात आहे. यामागे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत धूळ टाकून स्वतःचे भ्रष्टाचाराचे जाळे मजबूत करण्याचा डाव असल्याचा संशयही व्यक्त होत आहे.
या प्रकरणातील सर्व पुरावे लवकरच अधिकृतरित्या सादर केले जाणार असल्याची माहिती समोर आली असून, त्यानंतर  महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क तसेच एसीबीकडून कठोर कारवाई होणार की संबंधित अधिकाऱ्यांना संरक्षण दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जर या प्रकरणात योग्य कारवाई झाली नाही, तर संपूर्ण पुरावे थेट मा. श्री.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यातील ACB चे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात येणार असल्याचा इशाराही तक्रारदाराने दिला आहे. या तक्रारीमुळे पुणे उत्पादन शुल्क विभागात मोठी खळबळ उडाली असून, लवकरच या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या