दुय्यम निरीक्षक रोहित माने यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप — मालमत्तेचा स्फोट, एसीबीवरही प्रश्नचिन्ह...?

दुय्यम निरीक्षक रोहित माने यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप — मालमत्तेचा स्फोट, एसीबीवरही प्रश्नचिन्ह...?



प्रतिनिधी - सातारा/कराड 
राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक रोहित माने यांच्याविरोधात प्रचंड भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप समोर येत असून, त्यांच्या मालमत्तेचा वेगाने झालेला वाढता आकडा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गट ‘क’ मधील अधिकारी असतानाही 2018 नंतर अवघ्या काही वर्षांत त्यांनी कोट्यवधींची संपत्ती कशी उभी केली, याबाबत लवकरच चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कराड येथे माने यांच्या नावावर 2 बार, 1 देशी दारू दुकान (सध्या ट्रान्सफर प्रक्रियेत) असून, याशिवाय 2 FL-3 परवान्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सातारा येथे सादर करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर आलिशान बंगला, दोन महागड्या चारचाकी गाड्या, फ्लॅट आणि प्लॉट अशी अफाट मालमत्ता त्यांच्या नावे असल्याची माहिती पुढे आली आहे. सरकारी पगार आणि भत्त्यांवर एवढी संपत्ती उभी राहू शकते का? की यामागे मोठा भ्रष्टाचाराचा खेळ दडलेला आहे?

दरम्यान, सातारा आणि पुणे येथे कार्यरत असताना माने यांनी केवळ "पैसे गोळा करण्याचे" काम केल्याचा आरोप करण्यात येत आहे. सातारा येथे कार्यरत असताना लाचखोरीत अडथळा ठरणाऱ्या एका कर्मचाऱ्याला जाणीवपूर्वक  ट्रॅपमध्ये अडकवून कारवाई करण्यात आल्याचा धक्कादायक आरोपही पुढे आला आहे.या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणारी बाब म्हणजे, अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) पुणे यांनाही  उपाधीक्षक सुजित पाटील यांच्या हस्ते 20 लाख रुपये देऊन प्रकरण मॅनेज केल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. इतकेच नव्हे, तर माने स्वतः खुलेआम सांगत असल्याचे समोर येत आहे की, उपाधीक्षक सुजित पाटील हे ACB चा प्रोटोकॉल पाहत असल्याने उपाधीक्षक सुजित पाटील यांच्या द्वारे "एसीबीला पैसे देऊन काहीही मॅनेज करता येते", ज्यामुळे एसीबीच्या प्रतिमेवर मोठा डाग लागण्याची शक्यता आहे.

या सर्व आरोपांमुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि एसीबी दोन्ही यंत्रणांवर जनतेचा विश्वास डळमळीत होत आहे .

माने यांनी अवैध होलसेल दारू विक्री करणाऱ्या राहुल मांढरे यांच्या गटात तब्बल 80 लाख रुपये गुंतवले असल्याची माहिती समोर आली आहे. शासनाचा कर बुडवून चालणाऱ्या या रॅकेटशी थेट आर्थिक संबंध असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, संबंधित वाईन शॉपवर कारवाई होताच स्वतःची गुंतवणूक सुरक्षित नसल्याचे लक्षात येताच, माने यांनी इतर परवानाधारकांच्या माध्यमातून पैसे परत काढण्याचा प्रयत्न सुरू केल्याचेही समजते. तसेच “दुकाने चालवत नाही असा मेसेज द्या , कारवाई थांबेल” असा कानमंत्र देऊन शासनाचा महसूल बुडवण्याचा कट रचला असून त्याप्रमाणे प्रत्येक विभागात शॉप चालवायला असतानाही चालवत नाही असा मेसेज दिला गेला आहे.

बडतर्फीची मागणी जोरात संपूर्ण प्रकरणामुळे उत्पादन शुल्क विभागाची प्रतिमा मलिन झाली असून, एवढ्या गंभीर आरोपांनंतरही कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या उपाधीक्षक सुजित पाटील आणि रोहित माने या अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबन व बडतर्फीची कारवाई करून स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

सरकार आणि एसीबी आता काय कारवाई करणार? 
माने यांची संपत्ती कशी उभी राहिली याचे उत्तर कोण देणार?
या सर्व प्रश्नांची उत्तरे आता चौकशीतूनच समोर येणार आहेत…
एवढी माया कुठून आली? आणि कोणाच्या छत्रछायेखाली हा सगळा खेळ सुरू आहे?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या