" पुण्यात देशी दारू विक्रीत मोठा घोटाळा उघड " एमआरपी पेक्षा जास्त दर, बी विभागातील महिला अधिकाऱ्यांवर लाचखोरीचे गंभीर आरोप....?
पुणे (प्रतिनिधी)
शहरातील बी विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या देशी दारू विक्री दुकानांमध्ये मोठा आर्थिक गैरप्रकार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
अगरवाल देशी दारू दुकान - दांडेकर पूल, पाटील देशी दारू दुकान - स्वारगेट, V.R. गुप्ता - अरणेश्वर, भोंडवे देशी दारू दुकान - बालाजी नगर, T.T. पाटील - कोथरूड (शास्त्रीनगर) आणि शेट्टी देशी दारू दुकान - पौड फाटा
या परिसरातील दुकानदारांद्वारे ग्राहकांकडून एमआरपी पेक्षा 10 रु.जास्त दराने विक्री होत असल्याचे उघड झाले आहे.
दिनांक १८ एप्रिल २०२४ रोजी करण्यात आलेल्या प्रत्यक्ष पडताळणीत वरील सर्व दुकानांमध्ये प्रत्येक बाटलीमागे किमान ₹१० अधिक आकारले जात असल्याचे स्पष्ट झाले. या गैरप्रकाराचे पुरावे म्हणून
▪️ऑनलाईन पेमेंट व्यवहार
▪️प्रत्यक्ष खरेदीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग
यामध्ये संबंधित दुकानदारांनी उघडपणे “आम्ही एमआरपी पेक्षा जास्त दराने विक्री करतो” अशी कबुली दिल्याचेही समोर आले आहे. या विक्रीच्या व्यवहाराची दुय्यम निरीक्षक यांना असल्याचे पण सांगितले आहे.
या प्रकरणात संबंधित विभागातील दुय्यम निरीक्षक नीलम पाटील आणि शितल पवार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले असून, प्रत्येक परवानाधारकाकडून सुमारे ₹२५,००० रक्कम घेऊन जादा दराने विक्री करण्यास मूक संमती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. फक्त जादा दरच नव्हे, तर परवाना नूतनीकरणाच्या नावाखालीही मोठ्या प्रमाणात आर्थिक वसुली सुरू असल्याचा आरोप पुढे आला आहे. संबंधित दुय्यम निरीक्षकांकडून परवानाधारकांवर दबाव टाकून रक्कम उकळली जात असल्याचे सांगितले जात आहे. यातील बरेच दुकाने ही दुसऱ्या व्यक्तीला चालवायला दिलेली असतानाही कोणत्याही प्रकारे फी भरुन घेतली नाही. या गैरपद्धती लपविण्यासाठी महिला अधिकारी आपले आर्थिक हप्ते मजबुत करून शासनाला येणाऱ्या महसुलाची हानी ही केवळ वैयक्तिक आर्थिक स्वार्थासाठी करत आहेत. या महिला अधिकारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत कधीही हजर नसतात याचे ही पुरावे तक्रारदार यांच्याकडे पुरावे असल्याचे सांगितले आहे.
या सर्व प्रकाराची माहिती बी विभागातील वरिष्ठ निरीक्षक मधुकर राठोड यांना दिली आली असता त्यांनी “दुकानांवर गुन्हे दाखल करू” अशी भूमिका घेतली. मात्र, लाचखोरी करणाऱ्या दुय्यम निरीक्षकांवर कारवाई करण्याबाबत कोणतीही ठोस हमी देण्यात आली नाही,हे विशेष लक्षवेधी आहे.
या संपूर्ण प्रकरणाचे व्हिडिओ व आर्थिक व्यवहारांचे ठोस पुरावे लवकरच जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे तक्रारदारांनी स्पष्ट केले आहे. तसेच,जर कारवाई आणि नूतनीकरण करण्यासाठी गैर पद्धती थांबल्या नाही तर आक्रमक पद्धतीने पुढील कायदेशीर लढा उभारला जाईल,असा इशाराही देण्यात आला आहे.
पुण्यातील देशी दारू विक्रीत सुरू असलेल्या या कथित गैरप्रकारामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ प्रशासन या प्रकरणात कितपत कडक भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या