पुणे | प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागात पुन्हा एकदा वादग्रस्त घडामोड समोर आली आहे. दुय्यम निरीक्षक दत्ता पाटील यांच्यावर मुद्देमाल गहाळ व बेकायदेशीर विक्रीचे गंभीर आरोप असताना, संबंधित चौकशी अहवाल नकारात्मक (Negative) असल्याची माहिती समोर येत आहे.
पुणे अधीक्षक, दौंड निरीक्षक तसेच विभागीय उपायुक्त यांच्या अहवालांमध्ये त्रुटी व गैरप्रकार निदर्शनास आले असतानाही, सुनील चव्हाण यांनी कथितरित्या प्रकरण “मॅनेज” करून संबंधित अधिकाऱ्याला—दुय्यम निरीक्षक दत्ता पाटील हत्तीकट—यांना दुय्यम निरीक्षकवरून निरीक्षक पदावर पदोन्नती दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदारांच्या मते, संबंधित अधिकाऱ्याने शासनाच्या मुद्देमालाची विक्री करून प्रशासनाची प्रतिमा मलीन केली असतानाही, आस्थापना अधिकाराचा गैरवापर करून ही पदोन्नती देण्यात आली. यामुळे संपूर्ण प्रकरणावर संशयाची छाया निर्माण झाली आहे.
या प्रकरणी तक्रारदारांनी आक्रमक भूमिका घेतली असून माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे संपूर्ण चौकशी अहवाल, पुरावे आणि कागदपत्रांसह तक्रार सादर करण्यात आली असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
या प्रकरणामुळे उत्पादन शुल्क विभागात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित पदोन्नती प्रक्रिया आणि निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आता उपमुख्यमंत्री कार्यालय या गंभीर प्रकरणाची दखल घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या