निरीक्षक जे विभागात ‘हप्ते वसुली’चा मोठा घोटाळा? तानाजी पाटीलच्या नावाने खळबळ..!


निरीक्षक जे विभागात ‘हप्ते वसुली’चा मोठा घोटाळा? तानाजी पाटीलच्या नावाने खळबळ....!

रजिस्टर लिहिण्याच्या नावाखाली वसुली, ऑनलाईन व्यवहारातून पैशांची देवाणघेवाण; अधिकाऱ्यांचे मौन संशयास्पद


पुणे | प्रतिनिधी

निरीक्षक जे विभागात खाजगी व्यक्ती तानाजी पाटील याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हप्त्यांची बेकायदेशीर वसुली सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. “रजिस्टर लिहिणे” या नावाखाली नियमितपणे  दारू व्यवसाय करणारे परवानाधारक आणि संबंधित घटकांकडून पैसे उकळले जात असल्याची माहिती मिळत आहे. रजिस्टर संख्या ही 150 पेक्षा जास्त असून कोणत्याही परवानाचे रजिस्टर नोंदी पूर्ण नसतात रजिस्टर हे अपूर्ण असतात तरी देखील अधिकारी त्याच्याकडे दुर्लक्ष करून केवळ आपले हप्ते वसुली करतो त्यामुळे अभय देत आहेत

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, तानाजी पाटील हा केवळ वसुलीच करत नसून, संबंधित विभागातील काही अधिकाऱ्यांपर्यंत हे पैसे पोहोचवण्याचे कामही करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, या व्यवहारांसाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर होत असल्याचेही उघड झाले आहे, ज्यामुळे या संपूर्ण प्रकाराला अधिक गंभीर वळण मिळाले आहे.

याच पार्श्वभूमीवर, तानाजी पाटील यांच्या मालमत्तेची चौकशी केल्यास त्यांची संपत्ती एखाद्या सरकारी अधिकाऱ्यालाही लाजवेल इतकी मोठी असल्याचे निदर्शनास येत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्ती कशी जमा झाली, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दरम्यान, संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून, त्यांचे मौन संशय अधिक गडद करत आहे. जर तात्काळ कारवाई करून ही हप्ते वसुली थांबवली नाही, तर हा विषय थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे नेण्यात येणार असल्याचा इशारा स्थानिक पातळीवरून देण्यात आला आहे.

“हप्ते वसुलीचा हा प्रकार त्वरित थांबवावा, अन्यथा जनतेचा संताप उफाळून येईल,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

आता या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते, आणि संबंधितांवर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---

(टीप: या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या