स्वतःची गांड उताणी करून, CJP ह्यो आहे अन् त्यो आहे. अशी आहे अन तशी आहे ,याचा आवाज आहे, त्याचा आवाज आहे अन् आता देशात क्रांती घडणार प्रस्थापितांना घाम फुटला ,तरुण देशात बदल घडवतील असं म्हणून CJP म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीचा , जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र अध्यक्ष आणि अजून काय काय पदावर नियुक्ती झाल्याचा ढोल पिटवत, पोटाच्या देठा पासून कळा लपवत, बाता मारणारे फेस"बुकी", अचानक कोणत्या ड्रेनेज मध्ये लपले कळायला जागा नाही
6 जून ला अभिजित दिपके येतोय म्हणाला ,तर असं वाटलं होतं की आख्या महाराष्ट्रातला तरुण दिल्लीकडे कडे कूच करतो की काय !!
मात्र, दिल्ली तर सोडा साधी गल्लीतल्या टोळक्यामध्येही शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा नाही ओ ..
वाटलं आता तरुणांचे जत्थे च्या जत्थे निघतील ,किमान कॉकरोचाना बुडाखालून
बोट घालत आधार देणारे तरी जातील पण त्यांच्यात देखील काही एकी बेकी दिसत नाहीय, कारण दिल्लीचं नावं जरी ऐकलं तरी , अनेकांना घाम फुटतो
म्हणूनच कुणी दिल्लीला जाण्याची चर्चा बिर्चा करत नसावं
अर्थातच CJP ला घरात बसून पाठिंबा द्यायच्या, की रस्त्यावरच्या लढाईत उतरायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे , पण काहीही .म्हणा आपल्यात आलेली कमालीची मरगळ आता पैशाशिवाय जाणारच नाहीय ,कारण पार्टी म्हटलं की पैसे वाटप हे समीकरण झालाय ना आपल्या देशात , मग CJP चेअनेक स्वयंघोषित नेते वाट पाहत बसले असतील,अगदी ही लढाई त्यांच्या आणि त्यांच्यासारख्या अनेक तरुणींच्या भविष्यासाठी असली तरीही ते विचार करत असतील की *दिल्लीला जायला कुणी गाडी पाठवेल का ? येताना जातांना पाकीट (फूड)मिळेल का?
दिल्लीला गेल्यावर CP , आणि इतर टुरिस्ट प्लेस दाखवायला कुणी नेईल का?
वगैरे वगैरे ची वाट बघत बसलेले तरुणही असतील त्यांच्यात.
त्यामुळे आता दिपके आला तरी ,त्याच्या भोवती काँग्रेसीचां गराडा पडलेला असेल
मग सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातील, मग प्रत्येकजण काँग्रेसचा असल्याचा सांगेल, मग *दीपकेला काँग्रेसी ठरवले जाईल ,मग आंदोलन चिरडले जाईल
आपल्या देशात काहीही होऊ शकते
किंवा
खरेच देशातील
तरूणांना रागही येऊ शकतो आणि ते दिल्लीला देखील जाऊ शकतात . मग त्यांना अडवले जाऊ शकते , आणि मग *जगभरातील माध्यम या आंदोलनाकडे लक्ष ठेवून असल्याने भारताची तरुणांप्रति असलेली मानसिकता उघडी पडू शकते .
मग जगभरातील टिका टाळण्यासाठी राजीनामा घेतला जाऊ शकतो. आणि CJP ला मिळालेल्या या यशाने भारतभरातील तमाम विरोधी पक्ष आणि त्यातले नेते चाळणीत पाणी घेऊन जीव सुद्धा देऊ शकतात.
थोडक्यात
व्हायला काय काहीही होऊ शकते
पण
सध्यातरी सगळे बिळात आहेत
असो...
आपल्याला काय करायचं?
तुका म्हणे उगी रहावे
चित्ती असावे समाधान
माहिती सेवाभावी संस्था

0 टिप्पण्या