निरीक्षक सत्यवान गोगावले यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; पोलिसांनाच करावी लागतेय कारवाई, अवैध व्यावसायिकांना कोणाचा पाठिंबा.....?
खराडी, पुणे (विशेष प्रतिनिधी):
सोशल मीडियावर (Instagram) व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ क्लिपमुळे खराडी परिसरातील अवैध दारू व्यवसायाचे धिंडवडे निघाले आहेत. 'ड्राय डे' असतानाही खराडीत उघडपणे सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्रीच्या ठिकाणावर पीएसआय राठोड (PSI Rathod)यांनी धाड टाकून धडक कारवाई केली. एकीकडे पोलीस अधिकारी आपले कर्तव्य चोख बजावत असताना, दुसरीकडे मात्र ज्यांचे हे प्राथमिक कर्तव्य आहे, तो निरीक्षक आय विभाग राज्य उत्पादन शुल्क पुणे -1 (State Excise Department) डोळ्यांवर पट्टी बांधून गप्प बसल्याचे समोर आले आहे.
दारूबंदी कायद्यानुसार (Prohibition Act) अवैध दारूच्या धंद्यांवर वचक ठेवणे आणि कारवाई करणे हे प्राथमिक कर्तव्य राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आहे. खराडी हा परिसर निरीक्षक सत्यवान गोगावले यांच्या अखत्यारीत ('आय' विभाग) येतो. परंतु, आपल्याच कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे सोडून निरीक्षक गोगावले आणि त्यांचे दुय्यम निरीक्षक हात बांधून का बसले आहे..? पोलिसांना पुढे येऊन कारवाई करावी लागते, यावरून गोगावले हे अशा अवैध देशी दारू विक्रेत्यांना पाठीशी घालत आहेत का, असा थेट संशय आता व्यक्त केला जात आहे.
सत्यवान गोगावले यांच्या निष्काळजीपणाची आणि संशयास्पद भूमिकेची ही पहिलीच वेळ नाही. मागील काही महिन्यांतील घटनांवर नजर टाकल्यास हाच प्रकार वारंवार घडल्याचे दिसतो. (पुणे विषारी दारू प्रकरण) या गंभीर प्रकरणातही उत्पादन शुल्क विभागाने कानाडोळा केला होता, ज्यावर शेवटी पोलिसांनीच कारवाई केली. (तुळापूर येथील लेट नाईट पार्टी) नियम डावलून सुरू असलेल्या या पार्टीवरही पोलिसांनीच धाड टाकून कारवाईचा बडगा उगारला.या दोन्ही घटनांमध्ये निरीक्षक सत्यवान गोगावले यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती. त्यामुळे "दारूबंदी विभाग नक्की करतोय तरी काय?"पोलिस करतात कारवाई, गोगावले घेतात घरी विश्रांती......! असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
विभागाची प्रतिमा मलीन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी..? अशा प्रकारे स्वतःची जबाबदारी झटकून अवैध धंद्यांना अप्रत्यक्ष खतपाणी घालणाऱ्या आणि अत्यंत निष्काळजीपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाची प्रतिमा जनतेच्या नजरेत कमालीची मलीन होत आहे."हप्ते वसूल करायचे आणि कारवाईची वेळ आली की पोलिसांच्या मागे लपायचे" असाच काहीसा प्रकार या आय विभागात सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. आता तरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी या गंभीर बाबीची दखल घेऊन, कर्तव्यचुकार निरीक्षक सत्यवान गोगावले यांच्यावर कडक शिस्तभंगाची कारवाई करणार का..? की अवैध दारू माफियांचे राज्य असेच सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या